“मोदी – पवारमध्ये नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही ,राजकीय चर्चा तर होणारच”

0

 नवी मुंबई –   पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांची दिल्ली येथे भेट झाली आहे. हे भेट जवळपास एक तास सुरु होती अशी माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सूर झाले असून आता राज्यातून सुध्दा या भेटीवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. (“Modi-Pawar will not just have a climate discussion, there will be a political discussion”)

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी या भेटीवर भाष्य केला आहे ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येत्या सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, असं सांगतानाच पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच असं सूचक विधान त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणं स्वाभाविक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथित ही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असं त्यांना वाटलं असेल. राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणं हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं दरेकर म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना जोर 

Related Posts
1 of 1,184

शरद पवारांचं व्यक्तिमत्व वादातीत असू शकतं. पण त्यांचं राजकारण विकासाभोवती फिरतंय हे विरोधक असलो तरी आम्ही मान्य करतो. पवार मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न, राजकीय अस्थिरता, गुंतागुंतीचे विषय आणि अडचणीचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी ते गेले असतील. एखाद्या विषयावर अंतिम उपाय हा मोदींकडेच मिळू शकतो, असं पवारांना वाटलं असेल. शिवाय या भेटीला अधिवेशनाची पार्श्वभूमीही आहे, असं त्यांनी सांगितलं.(“Modi-Pawar will not just have a climate discussion, there will be a political discussion”)

जिल्ह्यात वाढला कोरोनाचा ग्राफ , आज इतक्या रुग्णांची नोंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: