मोदी दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही , ओवेसींचा मोदींवर निशाणा, पहा हा व्हिडिओ

0 215
नवी मुंबई –  सध्या देशातील राजकारणात सर्वात जास्त चर्चित असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्यावर टीका केली आहे. सीमेवर चिनी घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारात त्यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. मोदींना सांगू इच्छितो की ते दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. चीन आपल्या देशात घुसून बसला आहे असे ओवेसी म्हणाले.(Modi doesn’t open his mouth about two things, Owaisi targets Modi, watch this video)

ओवैसी म्हणाले जेव्हा पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला, तेव्हा मोदी म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, मग आम्ही मारा असे सांगितले. आता चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. त्यांना चीनबद्दल बोलायला भीती वाटते. आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी २० आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे.

धक्कादायक ! बहिणीच्या अनैतिक संबंधातून भावाची हत्या, आरोपीला अटक

Related Posts
1 of 1,512

भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्ही म्हटले होते ना? नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात?  आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?, असा प्रश्न ओवेसी यांनी केला आहे.(Modi doesn’t open his mouth about two things, Owaisi targets Modi, watch this video)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: