
अहमदनगर – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभेमध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज सकाळी (३० एप्रिल) रोजी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहे.
पुण्याहून औरंगाबादला जाताना अहमदनगर येथे स्वीट होम हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी जेवण केल्यानंतर ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहे. अहमदनगर मध्ये शिवाजी चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी हजारोंच्या संख्येने मनसे सैनिक जमले होते गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. गर्दी पाहून राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले.
मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद मध्ये सभा
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांना आज ऑनलाईन मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात शिवसेनेच्या राज्यभर सभा होणार असल्याचे सांगत, १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे आणि ८ जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभा होणार असल्याची माहिती दिली.