तुझ माझं जमतंय या मालिकेतील कलाकारांचा मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मनसे कडून सत्कार

0 17

अहमदनगर – मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अहमदनगरच्यावतीने शहरातील सुरू असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका तुझ माझ जमतय यातील कलावंतांचा सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला.

शहराच नावलौकिक करणाऱ्यांचा हा आदर यावेळी व्यक्त करण्याची संधी मिळाली यावेळी मोहनीराज गटणे बोलतांना म्हणाले की मराठी राजभाषा वर खुप प्रेम करा मराठी भाषा वाढवा तिचा संपुर्ण जगात जागर करा असा संदेश देऊन त्यांनी अहमदनगर वासियांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेच नितीन भुतारे म्हणाले की मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला हे आमचे भाग्य असुन कलाकारांमुळे दररोज मराठीचा दर्जा वाढवला जातो उंच शिखरापर्यंत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मराठीला मिळुन देण्याचे काम मराठी कलाकारांनी केले असून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळविण्या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रात्रंदिवस काम करीत राहणार असे भुतारे यांनी सांगितले.

यावेळी ,राहूल सुराणा,अमित रेखी, मालिकेचे दिग्दर्शक कुलकर्णी सर, विराज मुनोत,अंकुश काळे, यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मालिकेमधील कलाकार तंञज्ञ सहकार्य करणारे उपस्थित होते. यावेळी शहरातील कलावंताचा सत्कार करताना नक्कीच आनंद मिळतो पण आपल्यासारखे प्रसिद्ध आणि नामवंत कलावंत आमच्या शहरात येतात कार्य करतात याचाही आम्हाला जास्त आनंद होतो सर्वांना आपल्या अदांनी घायाळ करणारी पप्मी

Related Posts
1 of 1,291

तसेच झी मराठी देवमाणूस मालिका फेमम्हणजेच प्रतिक्षा जाधव यांचा यावेळी स्वागत आणि सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा महिलाध्यक्षा अँड.अनिता दिघे, गणेश शिंदे, संकेत होशिंग समर्थ उकांडे आदी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: