
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2022
तर दुसरीकडे राज्यासह देशातील परिस्थिती पाहता भोंग्यांच्या मुद्द्यावरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत सोशल मीडियावरील हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकूण १२,८०० आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, तर २२ खाती बंद केली आहेत. राज्यातील धार्मिक वातावरण सलोख्याचे राहावे यासाठी समाजमाध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले, तर दुसरीकडे, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीचे पथक दिवसाला अशा स्वरूपाच्या ३० ते ३५ पोस्ट डिलीट करत आहेत. राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते, असेही सायबर पोलिसांच्या निरीक्षणात समोर येत आहे.