वीज वितरण च्या विरोधात मनसेचे आंदोलन

0 13

अहमदनगर – राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना भरमसाठी वीज बिले आली आहेत. राज्य सरकारकडून बिलाबाबत सूट मिळेल असे आधी जाहीर केले होते.

मात्र, अनलॉक सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने हात वर केलेत. शेतकऱ्यांना  आलेली वीज बिले भरावी लागतील, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेतकार्यकच्या कृषि पंप आणि घरातील वीज कनेक्शन महावितरण कट करता असल्याने पिकांचे नुसकान होत आहे, या वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आक्रमक झाली आहे. वीज बिलात सूट देण्यात यावी आणि कृषिपंपाची वीज कनेक्शन कट करू नये अशी मागणी मनसेने केली आहे.

Related Posts
1 of 1,291

यासाठी आज मनसेने आंदोलन पुणे अहमदनगर या महामार्गावर सुपा येथे रस्ता रोको केले होते, या वेळेस वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडणार नाही मात्र वीज बिल टप्प्या टप्प्यानी भरावे असे सांगितले या वेळी हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: