
दिल्ली – उत्तर प्रदेशच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे (BJP) वादळ सुरू आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh assembly election) प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपने विधान परिषदेची निवडणूकही जिंकली आहे. भाजपने 36 पैकी 33 जागांवर कब्जा केला आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारांनी 9 जागा बिनविरोध जिंकल्या. 9 एप्रिल रोजी 27 जागांसाठी मतदान झाले होते. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने 27 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. तीन जागा अपक्षांनी जिंकल्या. समाजवादी पक्षाचे खातेही उघडले नाही. विशेष म्हणजे सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्येही पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. येथून भाजपमधून हकालपट्टी झालेले यशवंत सिंह यांचे पुत्र विक्रांत सिंह रिशू यांनी अपक्ष उमेदवाराच्या जोरावर विजय मिळवला आहे.
तुरुंगात बंद ब्रिजेश सिंह यांच्या पत्नी अन्नपूर्णा सिंह यांनी वाराणसी-चंदौली-भदोही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. येथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अखिलेश यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे सुनील कुमार साजन लखनौमधून निवडणूक हरले आहेत. आझमगडमध्ये अपक्ष उमेदवार विक्रांत सिंह रिशू यांनी भाजप उमेदवार अरुण कांत यादव यांचा 2813 मतांनी पराभव केला. येथे सपा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.