MLC By-Election , गुप्त पद्धतीने होणार मतदान, महाविकासआघाडी समोर आव्हान

0 173

नवी मुंबई –   या महिन्याच्या शेवटी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषद (Maharashtra Legislative Council) च्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक (MLC By-Election)  होत आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेस गटनेते शरद रणपिसे (Sharad Ranapise) यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडत असून त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीची (Maha vikas aghadi) डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (MLC By-Election, secret ballot, challenge to Mahavikasaghadi)

यावेळी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडत असल्याने कोणता आमदार कोणाला मतदार करणार हे फक्त त्यालाच माहित असणार आहे. सध्या महाविकासआघाडी सरकारला १७० आमदारांचा पाठींबा आहे.  गुप्तमतदान पद्धतीत आमदार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतीलच याची शाश्वती नाही. गुप्त मतदान पद्धतीने ही शाश्वती कोणालाही देता येत नाही.  जर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला उमदेवार देऊन मोठी राजकीय खेळी करते का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे पण पहा – नाशिकच्या ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Related Posts
1 of 1,512

दरम्यान, ही निवडणुक बिनविरोध करायची तर काँग्रेसला मोठी मेहनत करावी लागेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना साकडे घालावे लागेल.  जर निवडणूक पार पडलीच आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर महाविकासआघाडीमध्ये सर्वच काही अलबेल नाही. हे सरकार केव्हाही कोसळू शकतो असा संदेश जाऊ शकतो. जो सरकारसाठी भलताच त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची ठरली आहे.(MLC By-Election, secret ballot, challenge to Mahavikasaghadi)

PAK vs AFG, अन् स्टेडियम मध्ये तुफान हाणामारी, पहा हा व्हिडिओ

जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी- 9 ते 16 नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी- 22 नोव्हेंबर
  • मतदान- 29 नोव्हेंबर
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: