
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे राज्याचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी महावितरणच्या (Electricity distribution) गलथान व अनागोंदी कारभाराविरोधात यापूर्वीही अनेक वेळा आक्रमक होऊन आंदोलने केली होती महावितरणच्या चुकीमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे महावितरण दिलेली एजन्सी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे अवास्तव विजबीलांचा भार सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे .यापूर्वी कधीही न झालेले अनोखे आंदोलन सरडे यांनी केले असून दहा लाख किमतीच्या चुकीच्या पद्धतीने आलेल्या वीज बिलाचा हार कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला घालत हे आंदोलन सुरू झाले .
24 मार्च रोजी जितेश सरडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली व 27 मार्च पर्यंत त्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांचे निरसन झाले नाही तर,29 मार्च रोजी पारनेर शहरात रस्ता रोको करनार असा आक्रमक इशारा महावितरणला दिला होता .कुठल्याही अटींचे निवारण न करता उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून पारनेर शहरात रस्ता रोको करण्यात आला . व भर कडक उन्हामध्ये जितेश सरडे यांच्या नेतृत्वाखाली व वीज वितरण (Electricity distribution) कंपनीच्या तालुका कमिटीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घटक पक्षांच्या सर्व हितचिंतक मार्गदर्शक पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष सर्व नगरसेवक नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमरण उपोषणास सुरुवात झाली .
Ahmednagar news श्रीरामनवमी उत्सवानिमित काढण्यात येणार्या शोभायात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच
हे उपोषण मागे घेण्यासाठी व सकारात्मक चर्चा करण्यासाठी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता लहानगे, सहाय्यक अभियंता ठाकूर साहेब व पारनेर तालुका महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी सुरुवातीला अंगकाढू पणा करत चर्चेत सुरुवात केली . परंतु त्यांची निष्फळ चर्चेत काहीच फलित निघणार नाही अशी जाणीव झाल्यानंतर सरडे यांनी आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanka) यांच्याशी संपर्क केला . आमदार निलेश लंके यांनी गेले काही महिन्यात केलेले यशस्वी उपोषणे व आंदोलनाचा विचार करता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमदार लंके यांच्याशी सकारात्मक चर्चा करत या उपोषणाची सकारात्मक सांगता केली .
महावितरणचा (Electricity distribution) हा ज्वलंत प्रश्न असून सर्वसामान्य जनता यात भरडली जाते आहे . हे माहीत असतानाही जिल्ह्याचे व तालुक्याचे राजकारण करणारे अनेक पुढारी मंडळी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आले आहे . परंतु सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले व आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एक सर्वसामान्य घरातील नेतृत्व जितेश सरडे यांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अवास्थव विजबीला विषयी आंदोलन केले व ते यशस्वी केले . जितेश सरडे यांनी विविध मागण्या या आंदोलनात महावितरण समोर मांडल्या होत्या .महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या मागण्यांच्या वर चर्चा केली
२९ मार्चला उपविभागासमोर सरडे व इतर सहकार्यां सोबत करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये विविध स्तरावर चर्चा करण्यात आली होती,या बाबत
२४ मार्चला उपविभागीय कार्यालयात इतर पदाधिकारी सोबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली होती. परंतु सरडे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी उपोषणचा मार्ग पत्कारला. उपोषणातील चर्चे अंति खालील प्रमाणे प्रमुख तीन मागण्या होत्या. अवास्तव वीज देयक दुरुस्त करुन ग्राहकाच्या ऐपती प्रमाणे पैसे भरून उर्वरित रक्कम माफ करण्याची मागणी केली . ज्या थकबाकीदार ग्राहकांची विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तो विनाविलंब जोडून देण्यात यावा. सदोष मीटर त्वरीत बदलण्याचे हाती घ्यावी व पारनेर तालुक्यातील ग्राहकांना अचुक वीज बिल देण्यात यावी. वरील बाबतीत खालील प्रमाणे खुलासा महावितरण कडून करण्यात आला .
गौतमी पाटीलची लावणी , तरुणांनी गोंधळ उडाला, पोलिसांनी लाठीचार्ज.
ज्या वीज ग्राहकांचे संचयीत मीटर वाचनामुळे वीज देयके देण्यात आली त्यांची माहिती तंत्रज्ञान प्रणालीमध्ये दुरुस्त करण्यात आली व उर्वरित ग्राहकांची वीज देयक त्वरीत दुरुस्त करण्यात येईल व दुरुस्तीचे प्रकरणे परतवे व ग्राहकांच्या विनंतीनुसार कंपनीचे संचयीत वीज देयक पाहता वाजवी बिलाचे हप्ते करून देण्यात येतील. परंतु वीज देयकासाठी महावितरणा मधे कुठलीच तरतुद नाही . तसेच संबंधीत मीटर वाचन एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन महावितरणने दिलेले निविदा आदेश बडतर्फ करण्यात आले आहे . व सदर एजन्सीला काळया यादीत टाकण्याची प्रक्रीया चालू आहे. सदरील निर्णयानुसार ग्राहकांच्या विवादीत थकबाकीतील नमुद हप्ता तसेच चालू वीज देयकाचा भरणा केल्यानंतर त्वरीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. सदोष मीटर बदलण्याबाबत विभागीय कार्यालयाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले मीटर पारनेर उपविभागास जास्त प्रमाणात देण्यात येतील. माहे मार्च-२०२३ मध्ये अतिरिक्त २०० मीटर या कामासाठी देण्यात आले आहेत. तरी आपण उपोषणापासुन परावृत्त व्हावे असे आवाहन वीज वितरण चे अधिकारी यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्याकडे केले व सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांच्या आदेशाने जितेश सरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत सदर उपोषण मागे घेतले.