तहसीलदारांना शिवीगाळ प्रकरण आमदाराला तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड

0 451
अमरावती  –  तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या अंगावर माईक फेकल्या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) तब्बल सात वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल देत त्यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.(MLA sentenced to three months and fined Rs 15,000 for insulting tehsildar)
Related Posts
1 of 1,640
 

या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की 15 मे 2013 रोजी पंचायत समिती सदस्य असतांना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात गेले होते. यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते तुम्ही माझा फोन कट का केला? अशी विचारणा करत  देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना दम  देऊन तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी तहसीलदार राम लंके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 353, 186, 294, 506 अंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता. यात दोषापत्र दाखल करण्यात आल्याने आणि यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना 3 महिने सक्त मजूरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इतकेच नाही तर दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्याचं म्हटलं आहे.(MLA sentenced to three months and fined Rs 15,000 for insulting tehsildar)

पैसे दुप्पट करण्याचा मोह अंगाशी व्यवसायिकाला साडेचार लाखाला गंडा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: