आमदार रोहित पवार होणार मंत्री ? मंत्रिमंडळात मिळणार मोठं स्थान

0 3,365

अहमदनगर –   राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातुन राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) एक जागा कमी झाल्याने लवकरच मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (winter session) आधीच हा विस्तार होऊ शकतो. (MLA Rohit Pawar to be Minister? A big place in the cabinet)

मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदाची (Cabinet Minister) संधी मिळणार आहे. त्यांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्रीपद (Labor and excise duties) दिला जाणार आहे.

टीव्हीवरील जाहिरात पहिली अन् कौटुंबिक सुखासाठी महिलेने गमावले 37 लाख

पालकमंत्री पदाची जबाबदारी

Related Posts
1 of 1,635

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत पालकमंत्रीपदाची जबाबदारी पासून मुक्त करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केल्याने ही जबाबदारी देखील रोहित पवार यांना मिळण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. तरुण चेहरा, आमदार झाल्यानंतर विकासाच्या मुद्यावर अक्टीव्ह असणे आदी मुद्दे रोहित पवार यांच्याबाजून असल्याचं बोललं जात आहे.  (MLA Rohit Pawar to be Minister? A big place in the cabinet)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: