
पारनेर : आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) जनरल बॉडी सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांची वर्णी लागली आहे.
सामाजिक आरोग्य राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आवड व योगदान असलेल्या आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संधी दिल्याने लकी समर्थकांनी पारनेर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये एक जल्लोष साजरा केला आहे. तर दुसरीकडे रयत शिक्षण संस्थेमध्ये आमदार लंके यांना संधी दिल्याने पवार कुटुंबियांचे आमदार निलेश लंके यांच्या वरील प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सामाजिक, राजकीय क्षितिजावर आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आश्वासक पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगाने कंबर कसलेल्या आ. निलेश लंके यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी काम करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.