शेवगाव तालुक्यातील मिशन वात्सल्य बैठक तहसिल कार्यालय येथे संपन्न

0 189

प्रतिनिधी – बाबा पालवे
शेवगाव –    शेवगाव तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांचे अध्यक्षतेखाली शेवगाव (Shevgaon taluka) तहसिल सभागृहात दि.17 रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व त्यांच्या बालकांच्या योजना प्राधान्याने राबविण्याचे आदेश तहसिलदार यांनी बैठकीत दिले .

बैठकीस तहसिलदार अर्चना पागिरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा  समिती सचिव सोपानराव ढाकणे , गट विकास अधिकारी प्रतिनिधी पाटेकर ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ संकल्प लोणकर ,  गट शिक्षण अधिकारी तृप्ती कोलते,   संजय गांधी नायब तहसिलदार रमेश काथवटे नायब तहसिलदार मयूर बेरड,महिला तालुका संरक्षण अधिकारी सचिन जाधव व कृषि विस्तार अधिकारी,नगरपालिका प्रशासकीय अधिकारी बबन राठोड, पुरवठा अधिकारी विक्रम पुरोहित, कोरोना एकल महिला समन्वयक अमोल घोलप, चंद्रकांत लबडे, हरिभाऊ काळे,भाकपचे राज्यकार्याध्यक्ष अडव्होकेट सुभाष लांडे उपस्थित होते.

कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्युमुळे एकल ( विधवा )झालेल्या महिला व त्यांच्या मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन , त्यांना विविध कल्याणकारी योजना मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारीत मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्याच्या शासन आदेशानुसार शेवगाव तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती गठीत करण्यात आली आहे.  या समितीच्या झालेल्या बैठकीत शासन आदेशान्वये गाव पातळीवरील पथकाद्वारे कोरोना बाधीत कुटुंबातील महिला व मुलांचे सर्वेक्षण करणे , त्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे , वात्सल्य समिती मार्फत तालुकास्तरावरील संबंधित कार्यालायाकडुन मंजुरी घेणे , जिल्हास्तरीय मंजुरी आवश्यक असेल तर तेथे पाठविणे व पाठपुरावा करणे .
महिलांसाठी संजय गांधी निराधार यासह असणाऱ्या विविध वयोगटातील योजना ,मुलांसाठी बाल संगोपन योजना , दारिद्रय रेषेखालील असणा-या महिलेस राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यासह,विविध योजनांचे लाभ देणे शैक्षणिक अडचणी सोडविणे , गावपातळीवर असणा-या विविध योजनेत प्राधान्य देणे , उद्योग – व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण ,कर्ज प्रकरणे , अनुदान आदिंबाबत सहकार्य देण्याचे अध्यक्ष तहसिलदार अर्चना पागिरे व सचिव सोपानराव ढाकणे यांनी आश्वासन दिले.

मोठी बातमी ! काँग्रेस हायकमांडचा मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश

Related Posts
1 of 1,622

मयत पतीच्या नावावरील घर , जमीन यांची वारस नोंद तातडीने करणे , विभक्त किंवा नविन शिधापत्रिका वर रेशनचे धान्य लगेच सुरु करणे , महसुल , कृषि , महिला बाल कल्याण च्या सर्व योजनां व आवश्यक कागदपत्र ,  निकष यांची एकत्रीतपणे पुस्तिका करणे ,  बाल संगोपन कॕम्प शेवगाव येथे घेणे आदि सुचना कोरोना एकल महिला समितीचे समन्वयक तथा वात्सल्य समिती सदस्य अमोल घोलप यांनी केल्या. सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांडे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कामांची माहिती देऊन सेवाभावी संस्थे मार्फत मिळणाऱ्या योजना , उपक्रमाबाबत सांगितले व वात्सल्य समिती सदस्य चंद्रकांत लबडे , जेष्ठ कार्यरत हरिभाऊ काळे यांनी कोरोना बाधित कुटुंबास येणाऱ्या विविध अडचणी व समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

हे पण पहा – भाजपा मधील अनेक जण महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: