राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत धोत्रे येथे झालेल्या 2 कोटीच्या कामाचे दप्तर गहाळ

0 172
अहमदनगर –  धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ( National Drinking Water Scheme) झालेल्या 2 कोटी 38 लाख रुपयाचे काम शासनाच्या प्लॅन इस्टीमेट नूसार झालेले नसून, सदर कामाचे दप्तर गहाळ करणार्‍या तत्कालीन ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे.(Missing backpack of Rs 2 crore work done at Dhotre under National Drinking Water Scheme)
धोत्रे येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत धोत्रे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी तब्बल 2 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात आला. सदर योजना फक्त गावठाण हद्दीत असून, ती शासनाच्या प्लॅन इस्टीमेट नूसार वितरीत केली नसल्याने संघटनेच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार केले. मात्र अद्यापि शासकीय कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. धोत्रे पाणी पुरवठा योजनेचे 2 कोटी 38 लाख रुपये पाणीपुरवठा स्वच्छता समितीने घेतले. त्या समितीचे इतिवृत्त अनेक वेळा माहिती अधिकारात मागून देखील मिळाले नाही. यावर राज्य माहिती आयोगाने 23 मे 2019 रोजी आदेश देऊनही दप्तर उपलब्ध करण्यात आलेले नाही. ग्रामसेवक यांनी त्यांच्या कार्यकाळात या योजनेचा उल्लेख देखील केलेला नाही.
Related Posts
1 of 1,463
या पाणी योजनेचे काम शासकीय प्लॅन इस्टीमेट नूसार झालेले नसताना, बिला पोटी 2 कोटी 38 लाख रुपयाची रक्कम कशाच्या आधारे अदा करण्यात आली?, तर ज्या समितीने हा खर्च केला त्या समितीचे दप्तर देखील उपलब्ध होत नसेल तर हा खर्च कसा करण्यात आल्याचा प्रश्‍न संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. या योजनेत अपहार झाला असताना याची चौकशी होऊन तत्कालीन ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  (Missing backpack of Rs 2 crore work done at Dhotre under National Drinking Water Scheme)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: