पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालयाने दिली मान्यता

0 15

नवी दिल्ली – हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार मान्यता दिली आहे.

करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी २०२० पासून या औषधावर काम सुरू केले होते.

बाबा रामदेव यांनी या बद्दल सांगितले की कोरोनिल हे सर्वानाच करोनाविरोधी उपायात प्रभावी असल्याचे दिसून येईल. निसर्गोपचार पद्धतीचा वापर यात केला असून ते सर्वाना परवडणारे औषध आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती सादर केली असून कोरोनिल गोळ्या या कोविड १९ विषाणूला प्रतिबंध करतात.

Related Posts
1 of 1,291

या वेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पतंजलीच्या संशोधनामुळे देशाला नक्कीच फायदा होईल, असे सांगत बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे आभार मानले. ते वैज्ञानिक आधाराद्वारे पुन्हा लोकांसमोर आले आहेत, त्यामुळे औषधावरील लोकांचा विश्वास वाढेल, अशी खात्री गडकरी यांनी व्यक्त केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: