राज ठाकरे यांच्या सभेनंतर MIM ने घेतला मोठा निर्णय; आता औरंगाबादमध्ये ..

0 847
MIM took a big decision after Raj Thackeray's meeting; Now in Aurangabad ..

 

औरंगाबाद – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा घेत राज्य सरकारला मस्जिदीवरील भोंग्यावरून इशारा दिला आहे. या सभेनंतर राज्यातील राजकीय पारा चांगलाच तापला आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एआयएमएमची (AIMIM) देखील भव्य सभा होणार आहे. यामुळे आता राज्यात मनसे विरुद्ध एमआयएम संघर्ष पहिला मिळण्याची शक्यता आहे. एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी यासंदर्भात सुतोवाच केला आहे. मनसे आणि शिवसेनेला सभेसाठी परवानगी मिळत असेल तर मग आमच्यावर प्रतिबंध आहेत का? आम्हीदेखील औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य सभा घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. (MIM took a big decision after Raj Thackeray’s meeting; Now in Aurangabad ..)

 

 

१ मे रोजी राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेला सुरुवातील औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र त्यानंतर सशर्त परवानगी देण्यात आली होती. या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसेच्या सभेनंतर त्याच मैदानावर ८ जूनला शिवसेनेची सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलतात, हे पाहावे लागले.

Related Posts
1 of 2,357
मात्र, शिवसेना आणि मनसेच्या सभेप्रमाणे औरंगाबाद पोलीस एमआयएमच्या सभेला परवानगी देणार का, हेदेखील पाहावे लागेल. एमआयमच्या या सभेला परवानगी मिळाल्यास पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) याठिकाणी येण्याची शक्यता आहे. यावेळी ते मशिदींवरील भोंगे हटवण्यासंदर्भात काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल. (MIM took a big decision after Raj Thackeray’s meeting; Now in Aurangabad ..)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: