मीका सिंग पुन्हा चर्चेत ; ‘त्या’ प्रश्नावर भर कार्यक्रमात केली शिवीगाळ अन् ..

समोर आलेल्या माहितीनुसार मीका सिंहने दिल्लीमध्ये त्याचा शो ‘स्वयंवर- मीका दी वोटी’च्या प्रमोशन कार्यक्रामात एका पत्रकाराला शिवीगाळ केली. ही घटना एका बँक्वेट हॉलमध्ये घडली. ज्यावेळी एका पत्रकाराने मीकाला, ‘राखी सावंत या शोमध्ये सहभागी होणार आहे का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा मीकाला राग अनावर झाला. त्यावर मिका सर्वांसमोर शांत राहिला. मात्र नंतर तो कार्यक्राम सोडून निघून गेला आणि प्रश्न विचारणारा पत्रकार आणि शोच्या टीमला त्यानं एका रुममध्ये बोलावून शिवीगाळ केली. राखी सावंतशी संबंधित प्रश्न विचारल्यानं मीका सिंहला राग अनावर झाला होता.
काही वेळानं ‘स्वयंवर- मीका दी वोटी’च्या टीमनं संबंधित पत्रकाराची माफी मागतली आणि बंद रुममध्ये जी काही चर्चा झाली ती बाहेर कुठेही लीक होऊ न देण्याची विनंती देखील केली. दरम्यान मीका सिंह आणि राखी सावंत यांच्या २००६ साली एका मोठा वाद झाला होता. स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मीकानं राखीला बळजबरीनं किस केलं होतं. ज्यामुळे त्याला कायेदशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं.