रस्तालुट करणाऱ्या  चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक 

0 24

अहमदनगर –  शहरांमधील औरंगाबाद हावे रोड वरील शेंडी शिवार येते तीन चोरट्यांनी आपल्याजवळ असलेल्या कोयता आणि चाकूचा धाक दाखवत ट्रक चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या जवळील चार हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरट्यांना गुप्त माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप दिलीप,शशिकांत सावता चव्हाण असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 04 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पो स्टे येथे फिर्यादी नामे ज्ञानेश्वर किसन गजरे यांनी फिर्यादी दिली की, दि.04 मार्च 2021 रोजी ते त्यांचा मित्र किरण गायकवाड यांचेसह त्यांचे ताब्यातील ट्रक क्र.MH 16 CC-0861 मधुन ओरीसा येथे नेसकॉफी घेवुन जात होते .

पहाटे 04.30 वा.चे सुमारास औरंगाबाद हायवे रोड शेंडी शिवार, अहमदनगर येथे थांबले असतांना तिन इसम एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटारसायकल वर तेथे आले. त्यातील दोन इसम हे फिर्यादी यांचे ट्रकच्या केबीनमध्ये घुसले व त्यांचे हातातील कोयता व चाकु फिर्यादी यांचेवर उगारुन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादी व त्यांचा मित्र यांचेजवळील 4000 रु.रोख रक्कम व त्यांचे दोन मोबाईल फोन असा एकुण 46 हजार रु.किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

निघोजच्या उपसरपंचाकडून तलाठ्याला  मारहाण….गुन्हा दाखल 

 मजकुराचे फिर्यादी वरुन एमआयडीसी पोस्टे गु.र.नं 139/2021 भा दं वि क 397,392,323,504,506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपासात एमआयडीसी पोस्टे चे सपोनि/ वाय.यु.आठरे सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणारे चोरटे शेंडी चौक येथे येणार आहेत.

Related Posts
1 of 1,301

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

त्यानुसार मा.सपोनि। आठरे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि। सदाशिव कणसे, पोना/512 महेश दाताळ, पोना/1176 शाबीर शेख, पोहेकॉ/1433 युवराज गिरवले, पोहेकॉ/720 संदीप खेंगट पोशि/743 शिंदे असे तपास पथक रवाना होवुन संशयित आरोपी नामे 1) संदीप दिलीप कदम वय 25 वर्षे रा.डोंगरगण ता.जि.अहमदनगर 2) शशिकांत सावता चव्हाण, वय -22 वर्षे रा.आंबीजळगाव ता.कर्जत जि.अ.नगर यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे सदर गुन्हयातील मुद्देमाल तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल व कोयता मिळुन आल्याने त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.

अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तरुणाला कॅम्प पोलिसांनी केली अटक

फरारी आरोपीचा शोध चालु आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एन.कणसे करत आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील सो, अ.नगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल सो, अ.नगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील सो, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक युवराज आठर सो, पोउपनि, सदाशिव कणसे, पोना/512 महेश दाताळ, पोना/1176 शाबीर शेख, पोहेकॉ/1433 युवराज गिरवले, पोहेकॉ/720 संदीप खेंगट पोशि/743 जयसिंग शिंदे यांनी केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: