DNA मराठी

 Rohit Pawar:- हा प्रस्ताव रखडल्याने रोहित पवार आक्रमक…

कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) एमआयडीसीबद्दल अधिसूचना काढली जात नाही.

0 49

Rohit Pawar:- कर्जत : कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार(MLA Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या एमआयडीसीबद्दल शिंदे सरकारने अद्याप अधिसूचना जारी केली नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला फटकारले असून मतदारसंघातील लोकांसाठी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिली आहे.

Rohit Pawar : बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल आमदार रोहित पवार अडचणीत

शिंदे-फडणवीस Shinde-Fadnavis सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) एमआयडीसीबद्दल अधिसूचना काढली जात नाही. यावरुन रोहित पवार यांनी स्मरणपत्र आणि फोटो पोस्ट करत ट्विट केले आहे. रोहित पवार म्हणाले, की वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही.

Related Posts
1 of 2,528

त्यामुळे स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे.” त्यामुळे भविष्यात पवार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील संघर्ष वाढू शकतो.

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पण आता राज्य सरकार काय भूमिका देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एमआयडीसी प्रश्न तातडीने सुटणे महत्त्वाचे आहे.

परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जनतेमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला तर अनेकांना रोजगार मिळणार आहे. हा भविष्यात विकासाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: