हवामान विभागाकडून राज्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा , 11 जिल्ह्यांना इशारा

0 627

 नवी मुंबई –   भारतीय हवामान विभागा (Indian Meteorological Department) ने पून्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  वातावरणात झालेल्या बदलामुळे हा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  कोकण, पुणे सहीत मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Meteorological department warns of heavy rains in 11 districts)

12 ते 14 नोव्हेंबर रोजी राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.  उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे.

 

Related Posts
1 of 1,608

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘या’ महिन्यात करणार लग्न?

नागपूर आणि अकोला येथे पाऱ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे.  वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण (Rain in Maharashtra) झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा (Thunderstorm and lightning) इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. (Meteorological department warns of heavy rains in 11 districts)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: