सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची पळवापळवी सुरू

0 12

श्रीगोंदा   :- श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत झाल्यानंतर नवनिर्वाचित सदशयाना विविध आमिषे दाखविले जात आहेत. भांडणे, मारामाऱ्या आणि पळवापळवीने गावच्या सामूहिक जीवनात बिघाड होतो आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्य पळवापळवीचा प्रकार सुरू झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

                                 अजित पवारचं भेसळ करतोय, अशी माझी बदनामी व्हायची

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत  निवडणुकीत येथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. बहुतांश ठिकाणी  दुशंकू स्थिती निर्माण झाल्याने सर्वच्या सर्व सदस्यांना मोठे महत्त्व आले आहे.त्यात दि 28 जानेवारी  रोजी आरक्षण सोडत झाल्यामुळे अनेक पॅनल प्रमुखाची गाडी रुळावरून घसरली आहे  त्यामुळे सर्वांना खुश ठेवण्यासाठी पॅनल प्रमुख आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत या महिनाअखेरीस ही निवड होत असून कोणत्याही गटाला  बहुमत नसूनही सरपंच आमचाच होणार या इराद्याने पळवापळवी सुरू केली आहे.

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला……

Related Posts
1 of 1,291

सदस्यांना प्रलोभने दाखवून त्यांना पळविण्याचा प्रकार सुरू असल्याचे तालुक्यातील प्रत्येक गावात दिसत आहेत  सदशयाना खुश करण्यासाठी सोमरस यासह यथेच्छ मटणाच्या खानावळी चालू असून याचबरोबर प्रेक्षणीय स्थळे तसेच देव दिवरुषी सगळे काही हाताळले जात आहेत याबाबत काही तोंडी तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र या सर्व प्रकारामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही त्यामुळे या बाबतीतपोलिस उपअधीक्षक यांच्यापर्यंत गेले असून पोलिसांनीदेखील हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.

    फोटो दिला नाही तर तुझी बदनामी करणार अशी धमकी देणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी केली अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: