
अहमदनगर : सोशल मीडियामुळे (Social media) आता कामे वेगाने होत आहे. एकाच वेळी अनेकांशी सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधणे सोयीस्कर झाले आहे. परंतु या ग्रुपवर सुरवातीला माहितीची देवाणघेवाण झाली. मात्र सध्या कर्मचारी वाढदिवस त्यानंतर लग्न सोहळे वाढदिवस साजरे होऊ लागले आहेत. याला ग्रुप सदस्य कंटाळेले आहेत.
कार्यालयातील कामकाज वेगाने व्हावे, एकमेकांना संपर्क साधणे सोपे जावे, यासाठी समाज माध्यमावर ग्रुप तयार करण्यात आले आहे. या ग्रुपमुळे कामे वेगाने होऊन विना तक्रार व बिनचूक वेळेतसहोऊ लागलेली आहेत. एकच वेळी अनेकांशी संपर्क साधण्यास या ग्रुपचा मोठा फायदा होत आहे. परंतु कार्यालयातील ग्रुपवर ठराविकच अधिकारी व कर्मचार्यांची वाहवा केली जात आहे.
हे काम का त्या संस्थेतील मोजकेच लोक करीत आहे. आपले नियमित कामे सोडून ते फक्त वरिष्ठ व आपल्या फायद्याच्या कर्मचारी यांचे वाढदिवस व इतर बाबी लक्षात ठेऊ तसेच स्टेटस पाहून कार्यालयीन ग्रुपवर पोस्ट अपलोड करीत आहेत. नियमाला पक्के असणारे व इतरांनी काही पोस्ट टाकल्यावर त्रागा करणारे स्वतची वाहवा आल्यानंतर च्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे दुसर्यांना संबंधित शुभेच्छा देत नसून इतरांकडून मात्र अपेक्षा करीत आहे.
संबंधितांच्या वाढदिवसाबरोबर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सोहळे सुरु करण्यात आलेले आहेत. याला कर्मचारी कंटाळले आहेत. कार्यालयात वाद नको म्हणून गप्प असले तरी एकमेकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यांबरोबर मधुचंद्राच्या रात्रीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तारखा कळवा, असे त्याही कार्यालयातील झेलकरी व टाळकरी शुभेच्छा देतील, असे कर्मचारी बोलत आहेत.