वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

0 143

पारनेर  –  “चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, असे सांगतानाच “अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा” अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी केली.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील वनकुटे ते वडगाव सावताळ रस्ता सुधारणा करणे रक्कम रुपये.१२०.०० कोटी, वनकुटे ते पठारवाडी रस्ता सुधारणा करणे रक्कम रुपये.५०.०० लक्ष, हनुमान नगर येथे पाणी पुरवठा लाईन करणे रक्कम रुपये.२५.०० लक्ष,व्यायाम साहित्य बसवणे रक्कम रुपये.५.०० लक्ष या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण  शुभारंभ ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शेख बोलत होते. आ. नीलेश लंके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

लंकेवरील टीकेचा शेख यांच्याकडून समाचार 

आ. निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. “अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.

 सर्वसामान्यांचे यश डोळ्यात खुपते

आमदार निलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केलं. “लंके यांच्यावर आरोप झाला मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं अस्तिव निर्माण करत असेल त्यावेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असते, त्यातून असे आरोप होत असतात”, असं ते म्हणाले.

WhatsApp चॅट हिस्ट्री होणार सहज ट्रान्सफर, व्हॉट्सअ‍ॅप आणणार नवीन फिचर

Related Posts
1 of 1,635

चांगल्या माणसाच्या बदनामीसाठी सुपारीची पद्धत !

“पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपाऱ्या द्यायचे. मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते. तुमचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडल गेलं असून माझ्यावरही असेच आरोप झाले. तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात”, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

नवऱ्याच्या नार्को टेस्ट साठी तुम्ही तयार आहात का ?

“ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की माझी नार्को टेस्ट करा. दोषी असेल तर मला चौकात फासावर चढवा… जसं मी पुढे येऊन सांगतोय तसं तुम्ही ही पुढे येऊन सांगा, माझा नवरा दोषी नाही… त्याची देखील नार्को टेस्ट करा”, असं आव्हानच त्यांनी चित्रा वाघ यांना दिलं. तसेच चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सर्व लोक ओळखतात. कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नसून भाजपचे लोक सांगतात तुमचं नाव करायचं असेल तर ५ कोटी द्या, अशी मागणी त्या करतात. अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत. योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेन, असा इशारा त्यांनी जाताजाता  वाघ यांना दिला.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: