काँग्रेसमध्ये बैठकांचा फेरा सुरू: प्रशांत किशोरबाबत लवकरच निर्णय

0 135
Meetings begin in Congress: Decision on Prashant Kishor coming soon

दिल्ली – मागच्या तीन चार दिवसांपासून काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाला 2024 च्य लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आखलेल्या रणनीतीबाबत पक्षांतर्गत सखोल विचारविनिमय करत आहे.

पक्षाच्या नेत्या अंबिका सोनी, पी चिदंबरम, केसी वेणुगोपाल आणि इतर काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली आणि प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर सखोल चर्चा केली. किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की नाही आणि जर त्यांनी तसे केले तर त्यांची पक्षात काय भूमिका असेल याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Related Posts
1 of 2,229

निवडणूक रणनीतीकार किशोर हेही शुक्रवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सविस्तर सादरीकरण करतील, असेही सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर म्हणाले की, किशोर यांना बिनशर्त पक्षात प्रवेश घ्यायचा होता आणि त्यांच्या येण्याने काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोरबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: