पिंपरीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा, मात्र अजित पवार गैरहजर चर्चांना उधाण..

0 180

पिंपरी चिंचवड – आगामी काळात राज्यात अनके महानगर पालिका निवडणुक होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड या महापालिकेचा देखील समावेश आहे.या निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षाने आपली आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Meeting should be held in Pimpri in the presence of Sharad Pawar, but Ajit Pawar is absent)

पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवाती पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लामध्ये शरद पवारांच्या (sharad pawar) उपस्थितीत मेळावा होत आहे.

या मेळाव्याला मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) गैरहजर आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवारही या मेळाव्याला आले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे. शरद पवारांचे जुने कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आणि आयोजनाच्या केंद्रस्थानी आहे. पवार तब्बल 17 वर्षांनी पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्याआधी शरद पवार हे पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवड भागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. मात्र काही जुन्या मंडळींचा संपर्क वगळता पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही. इथली जबाबदारी कायम अजित पवार यांच्यात खांद्यावर होती.

2016 च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा पराभव झाला होता पाठोपाठ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेतून पराभव झाला होता. त्यानंतर सरकार आल्यावर ही पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीची मरगळ काही केल्या संपत नव्हती.

Related Posts
1 of 1,517

अजित पवार यांनी पाळला शब्द, आमदारांना दिला दसऱ्याचे गिफ्ट

 महापालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या नंतरही महापालिकेत सत्तांतर होईल, असं कुणी खात्रीने सांगू शकत नाही, स्थानिक राष्ट्रवादीत तसा कुठलाही जोर दिसत नाही. गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर आणा असे साकडे घालत काही जुनी मंडळी गाऱ्हाणं घेऊन शरद पवारांकडे गेली आणि पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा लावला.

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

शरद पवार यांनी अनेकांना भेटीगाठीसाठी बोलावलं मात्र या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि अलीकडच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणारे पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर पवार आणि प्रश्नचिन्ह लावलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Meeting should be held in Pimpri in the presence of Sharad Pawar, but Ajit Pawar is absent)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: