
पारनेर : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथे मुलाचा खून करून वडिलांनी गळफास लावून घेतल्याची घटना घडली होती. हे हत्याकांड दारूच्या नशेतूनच झाले असल्याचे तपास स्पष्ट झाले आहे.
पिंपळगाव रोठा येथे 28 मार्चला पत्नीचा खुनाचा प्रयत्न, मुलाचा खून करून वडिलांनी फाशी घेतल्याची घटना घडली होती. संतोष रासकर (वय 40), मुलगा आदर्श (वय 6) यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर पत्नी सुजाता हिला गळादाबून मारण्याचा प्रयत्न झाला होता. ती बेशुद्ध पडल्याने बचावली होती. याचा तपास पारनेर पोलिसांनी बारकाईने केला असून यामध्ये दुसर्या कोणत्याही व्यक्तींचा सबंध नसल्याचे समोर आले आहे. संतोष यास दारू पिण्याचे व्यसन होते. तो नेहमीच पत्नी सुजाता व मुलांना मारहाण, शिवीगाळ करत असे. यामुळे पत्नी पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती.
ahmednagar crime: तीन हॉटेलवर छापे… देहविक्री करणार्या सात महिलांची सुटका…
25 मार्चला त्याने पत्नीस सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तो नशेत असल्याने पत्नीने दुर्लक्ष केले. मात्र 28 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संतोष याने किचनमध्ये पत्नी सुजाता हिचा हाताने गळा दाबला आणि डोके पाठीमागील बाजूस जमिनीवर जोराने आपटले. यामुळे ती बेशुद्ध पडली. ती मेल्याचे समजून संतोषने रागात मुलगा आदर्श याचा गळा दाबून ठार मारले. स्वत: घरातील छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतला.
पत्नी सुजाता शुद्धीवर आल्यावर तिने चाकुने आसाची दोरी कापली. व मोठमोठ्याने आरडाओरड केली असता जवळ राहणारे शेजारी व नातेवाईक यांनी तिला टाकळी ढोकेश्वर येथे व पुढे अहमदनगरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावरून पती संतोष याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर हे पुढील तपास करीत आहेत.