सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा(Married woman)छळ करून आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दीर आणि सासूला अटक करण्यात आली आहे. पती अनिल रामकिसन गुंजाळ (वय ३१), दीर अमोल रामकिसन गुंजाळ (वय २७), सासू मंगल रामकिसन गुंजाळ (वय ४५, सर्व रा. सोनेवाडी ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ एप्रिल, २०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. रेखा अनिल गुंजाळ (वय २४ रा. सोनेवाडी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
सासरच्या छळाला कंटाळून रेखा गुंजाळ हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सोनेवाडी शिवार, मेहेकरी फाट्याजवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी अनिल गुंजाळ, अमोल गुंजाळ, मंगल गुंजाळ व दीपक गोरख गुंजाळ (सर्व रा. सोनेवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.