
नगर : माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून नेतेमंडळींची मनधरणी सुरु आहे. दुसरीकडे उमेदवारी न मिळल्याने मोठ्या प्रमाणात नेतेमंडळींवर नाराजी ओढवली असल्याने याचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परिणीती चोप्राने दिले राघव चढ्ढासोबत लग्न संकेत! पहिल्यांदाच मौन सोडले…..
नगर तालुका बाजार समितीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले – माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शड्डू ठोकला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. तर दोन्ही गटांकडून बाजार समितीवर सत्ता येण्याचा दावा ठोकला आत आहे.
असे असले तरी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती १८ जागांसाठी २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघा एक दिवसच शिल्लक राहिला असल्याने इच्छुकांची नेते मंंडळींच्या दरबारी पळापळ सुरु आहे. तर संभाव्य उमेदवारांकडून मतदारांच्या गाठी भेटी सुरु आहेत. नेतेमंडळी उमेदवारी कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असून उमेदवारी अर्ज माघारीनंतरच हे स्पष्ट होणार आहे.