विवाहितेचा छळ; कोतवालीत पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर – सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याने तसेच वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा किरण बोरूडे (वय २३ रा. आंबेकर मळा, वाकोडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पती किरण बाळासाहेब बोरूडे, सासू शारदा बाळासाहेब बोरूडे, सासरे बाळासाहेब विश्वनाथ बोरूडे, दीर आकाश बाळासाहेब बोरूडे (रा. शास्त्रीनगर, केडगाव), तसेच नंदावे निलेश लोंढे आणि नंदा योगिता निलेश लोंढे (रा. लोंढेमळा, केडगाव), सुजाता सुनील शिंदे (रा. पिंपरी चिंचवड) आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा यांचे किरण याच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. सहा महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी स्नेहा यांना त्रास देण्यास सुरूवात केली. घरगुती किरकोळ कारणावरून मारहाण, दमदाटी करून शारीरीक व मानसिक छळ केला. सासू, सासरे यांनी वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच नंदावे व नंदा यांनी खोटे आरोप करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. जानेवारी २०२२ मध्ये घरातून हाकलून दिले.
पतीने भरोसा सेल येथे अर्ज दाखल केला. तुला नांदायला यायचे असेल, तर माहेरून पाच लाख रुपये घेवून ये, असे पतीने सांगितले. समेट न झाल्याने भरोसा सेल यांनी पत्र देवून फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.