बेलवंडी फाट्या नजीक टँकर पलटी होऊन कात रस्त्यावर सांडल्याने अनेक जण घसरून पडले

0 20

  श्रीगोंदा  :-  वेळ सकाळची, ठिकाण नगर दौंड रस्ता अनेकजण आज सकाळी या रस्त्याने जात असताना बेलवंडी फाट्यानजीक निलगिरी ढाब्याजवळ एक केमिकल वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात पलटी झाला.  त्यातील सर्व केमिकल नगर दौंड या मुख्य रस्त्यावर सांडले त्यामुळे या रस्त्याने जाणारे जवळपास ३० ते ४०दुचाकीस्वार त्याठिकाणी घसरून पडले आहेत मात्र दैव बलवत्तर यात कोणालाही मोठ्या प्रमाणात इजा झालेली नाही.

जो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही  – रुणाल जरे 

 मिळालेल्या माहितीनुसार यात जास्त कुणी जखमी झाले नसले तरी या रस्त्यावरील टँकर मधील काताच्या केमिकल मुळे एवढया मोठ्याप्रमाणात दुचाकीस्वार घसरून पडले आहेत . अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर बेलवंडी पो नि संपत शिंदे, पो ना ज्ञानेश्वर पठारे यांच्यासह बेलवंडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे . सदर ठिकाणी टँकरच्या सहाय्याने रस्त्यातील केमिकल धुण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Related Posts
1 of 1,290

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: