आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीचा अनेकांना विसर

0 174

श्रीगोंदा  :-  दि ७ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक( Raje Umaji Naik)  यांनी जयंती साजरी करण्याचे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिले असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश सरकारी कार्यालयात जयंती साजरी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे मात्र याबाबत सजग पत्रकारांनी याबाबत जागृती केली असता सर्वच ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.

 महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो. लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटूंब. वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता.
Related Posts
1 of 1,608
सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता. कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली. इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले होते त्यांची आज ७ सप्टेंबर रोजी जयंती साजरी करण्यात येते  त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्देशही दिलेले आहेत मात्र याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वगळता सर्वच ठिकाणी विसर पडल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळाले मात्र याबाबत तालुक्यातील पत्रकार दादा सोनवने यांनी याबाबत शोषलं मीडियावर खंत व्यक्त केली असता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात, श्रीगोंदा तहसील कार्यालय, पंचायत समिती मध्ये  उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली मात्र लढवय्या क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीचा विसर सर्वांना पडला होता असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: