मनोज वाजपेयीने केआरके विरोधात केला मानहानीचा दावा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 145

नवी मुंबई –   बॉलीवूड (Bollywood) चित्रपटाबद्दल आपला मत मांडून सोशल मीडियावर अभिनेते आणि अभिनेत्री बद्दल टीका करणारा अभिनेता कमाल आर खान (KRK) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. कधी सलमान (Salman) तर कधी शाहरुख (Shaharuk) खानावर टीका करताना आपण  कमाल आर खानला पाहिला आहे.  केआरके परत एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.  केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी ( Manoj Vajpayee) विरोधात अपमानास्पद ट्वीट केल्याचे म्हटले जाते. त्यानंतर मनोज वाजपेयीने मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनोजने तक्रार दाखल केल्याची माहिती त्याचे वकील परेश एस जोशी यांनी दिली आहे.(Manoj Vajpayee’s defamation suit against KRK, know the whole case)

केआरकेच्या आक्षेपार्ह ट्वीटबाबत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. यामध्ये केआरके विरोधात कमल ५०० अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती केली आहे. २६ जुलै रोजी मनोज विरोधात केआरकेने अपमानास्पद ट्वीट केल्याचे त्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे इंदौरमध्ये असलेल्या चाहत्यांमध्ये अभिनेत्याची प्रतिमा खराब झाली आहे, असे जोशी म्हणाले.

नारायण राणे ‘नॉर्मल’ माणूस नाही तर कोण ? सामना च्या अग्रलेखामधून टीका

परेश एस जोशी यांनी पुढे सांगितलं की, मनोज स्वत: इंदौरच्या न्यायालयात मंगळवारी उपस्थित होते. त्यावेळी त्याने जबाब नोंदवला आहे. दरम्यान, केआरके विरोधात या आधी ही बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सलमानने देखील त्याच्या तक्रारीत म्हटले होते की केआरकेने सलमान आणि त्याची कंपनी बिईंग ह्युमन विरोधात अपमानकारक ट्वीट केले.

Related Posts
1 of 84

मी आयुष्यात लुक्खा आणि फालतू नाही, म्हणून मी वेब सीरिज पाहत नाही. तुम्ही सुनील पाल यांना विचारा. पण तुम्हाला एक चरसी, गंजेडी मनोज बघायला का आवडते? आपण फक्त आवडत्या कलाकाराला पाठिंबा देऊ शकत नाही. जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये चरसी गंजेडीचा तिरस्कार असेल तर तुम्ही प्रत्येकाचा तिरस्कार केला पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले होते.(Manoj Vajpayee’s defamation suit against KRK, know the whole case)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: