मनोज ठवकर मृत्यू प्रकरण- अखेर पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

0
 नागपूर –   नागपूर शहरातील पारडी चौकात  हनुमान मंदिर परिसरात ०७ जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु असताना 35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग आपल्या घरी जात असताना पोलिसांनी त्याला रोखण्यास सांगितले मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला होता . (Manoj Thakkar death case: Three employees including a police sub-inspector finally suspended)
 पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरात तणाव होता.
Related Posts
1 of 1,153
त्यानंतर या प्रकरणाची नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेऊन तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.  मात्र आता पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे.(Manoj Thakkar death case: Three employees including a police sub-inspector finally suspended)

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वृद्धेचे घर पाडून केले बेसहारा , चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: