ममता देणार भाजपाला धक्का ,सौरव गांगुली जाणार राज्यसभेवर?

0
 कोलकाता –  नुकताच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडले या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हरवून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  पश्चिम बंगालचे तिसर्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपला धक्का देत जवळ पास १० पेक्षा जास्त आमदार आपल्या पक्षात आणले.   तर आता ममता बॅनर्जी  परत एक धक्का भाजपाला देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) तृणमूल काँग्रेस (TMC) कडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चाना राजकीय वर्तुळात जोर आला आहे. सौरव गांगुलीने  ८ जुलै रोजी आपला ४९वा वाढदिवस साजरा केला. गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी त्याची भेट घेतली.  त्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांच्या सुध्दा समावेश होता. या भेटीनंतर गांगुली तृणमूलकडून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
गेल्या काही काळापासून गांगुलीला भाजपमध्ये आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध गांगुलीला उभे करण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा गांगुलीने राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले होते.

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ , पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स

Related Posts
1 of 1,222
दिनेश त्रिवेदी यांनी टीएमसी सोडल्याने आणि राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने तसेच मानस भुइना यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या चर्चेवर अद्याप तृणमूलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण भाजपचे  प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष (BJP state president Dilip Ghosh) यांनी मात्र जर गांगुली राज्यसभेचे सदस्य झाले तर आम्हाला काहीच आक्षेप असू शकत नाही असे म्हटले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: