ममता बॅनर्जींचा सवाल योग्य मात्र काँग्रेसला दूर ठेवून तिसरी आघाडी नाही – संजय राऊत

0 164

नवी मुंबई –   नुकताच पश्चिम बंगाल (West Bengal) च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यानंतर देशात पुन्हा एकदा तिसरी आघाडी स्थापन (third Front) करण्यासाठी प्रयत्न होणार का याची चर्चा सुरू झाली आहे . ममता बॅनर्जी यांनी आपल्या या दौऱ्यात माञ राज्यातील एकही काँग्रेसच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली नाही. (Mamata Banerjee’s question is correct but Congress is not the third front – Sanjay Raut)

त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये यूपीए कुठे आहे ? असा सवाल उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. भाजपविरोधी लढाईत ममता बॅनर्जी महत्त्वपूर्ण योद्धा आहेत. पण काँग्रेसला सोबत घेऊन काम केले तर चांगली आघाडी (फ्रंट) तयार होईल. काँग्रेसला दूर ठेवून आघाडी योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

धक्कादायक ! फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने केला बलात्कार, आरोपीला अटक

Related Posts
1 of 1,635

संजय राऊत पुढे म्हणाले की यूपीए कुठे? हा ममतांचा सवाल योग्य आहे. ममतांच्या मनात गृह आहे की काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की यूपीएला मजबूत केले नाही तर २०२४ (मिशन २०२४) मध्ये कसं लढणार. त्यासाठी काँग्रेसला सोबत घेऊन पुढे जावे लागेल. यूपीएच्या प्रमुख सोनिय गांधी यांच्या नेतृत्त्वावर कोणताही सवाल नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.भाजपविरोधात पर्याय बनेल पण नेता कोण याचा निर्णय नंतर घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Mamata Banerjee’s question is correct but Congress is not the third front – Sanjay Raut)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: