श्रीगोंदा येथे 20 फेब्रुवारी रोजी माळी समाज वधू – वर परिचय मेळावा

0 11
श्रीगोंदा  :-  महात्मा जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर व अस्तित्व फाउंडेशन श्रीगोंदा यांचे संयक्त विद्यमाने  श्रीगोंदा शहरातील बालाजी मंगल कार्यालय, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ ते ५:३० या वेळेत राज्यस्तरीय माळी समाज विवाह इच्छुक नव वधू- वर व विधवा, विधुर, घटस्फोटीत पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील माळी समाज विवाह इच्छुक वधू-वर व त्यांचे पालक यांनी उपस्थित राहुन वधू-वरांची नाव नोंदणी करण्याचे आवाहन मेळावा आयोजक सुधाकर बोराटे, अॅड. नवनाथ फोंडे, अॅड. हरिश्चंद्र राऊत, गोरख आळेकर व जिवननाथ खीलारे व आकाश रासकर यांनी केले आहे.

                                    राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप ? देवेन्द्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य

  तंत्रज्ञानाच्या युगातील स्पर्धेमुळे घरातील कर्त्याला कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मीळत नाही.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरातील विवाह कार्याचे सर्व निर्णय हे घरातील जेष्ठ मंडळीच घेत असत.परंतु प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रचलित युगामुळे आता विभक्त कुटुंब पद्धती समाजात जास्त रूजत असल्याने घरातील जाणत्या मंडळीकडे दुर्लक्ष होत आहे. आत्ताच्या आधुनिक जगात मुला मुलींचे विवाह जुळवायचे असतील तर उपवर पालक परिचय मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे असुन श्रीगोंदा येथे होत असलेला हा मेळावा क्र.१६ वा आहे.

 

Related Posts
1 of 1,291

ड्रग्ज अ‍ॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का? – सचिन सावंत

  मेळाव्यासाठी येताना वधू- वर यांनी स्वत:ची माहिती बायोडाटा व आयकार्ड साईज रंगीत दोन फोटो  आणावेत.वधू-वर यांचेसोबत त्यांचे पालक किंवा एक नातेवाईक यांना सोबत आणावे.जेणेकरून अपेक्षित वधु-वर व त्यांचे पालकाशी चर्चा करता येईल.मेळावा नावनोंदणी करणे अनिवार्य राहील.मेळावा फी पाचशे रुपये राहील.मेळावा पुस्तक प्रकाशित होणार असुन पुस्तक चार्ज वेगळा राहील.मेळाव्यात विवाह इच्छुक नव वधू-वर, विधवा, विधुर व घटस्फोटीत इत्यादी सर्वांना सहभागी होता येईल.अधिक माहितीसाठी ९५६११९०३३२, ९८८१०५५६९६, ९४२२२३१५७६, ९५४५४५४७३० या मो.न. वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

                                 विवाहित महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून जीमचालकाने केले अत्याचार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: