अन् ब्रेकअपची चर्चा ऐकून भडकली मलायका अरोरा, म्हणाली….

0 187

मुंबई – बॉलिवूडची (Bollywood) चर्चित अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप (Breakup) झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सूरु आहे.

अभिनेता अरबाज खानपासून (Arbaz Khan) वेगळं झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत(Arjun Kapoor) रिलेशिपमध्ये आहे. हे दोघे आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. माञ काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती. यावर मलायका अरोरानं प्रतिक्रया दिली आहे. मलायकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यांचा संबंध त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांशी जोडला जात आहे.

पुन्हा इंदुरीकर महाराज अडचणीत , “त्या” विधानावरून कारवाईची मागणी

Related Posts
1 of 96

मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं अशाप्रकारच्या ब्रेकअपच्या चर्चांवर राग व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, ‘जर तुम्हाला वयाच्या ४० वर्षी प्रेम मिळालं तर ही सामान्य गोष्ट आहे असं समजायला हवं. वयाच्या ३० वर्षी जर तुम्ही नवी स्वप्न पाहत असाल आणि ती पूर्ण करण्याची तयारी ठेवत असाल तर यात नवीन काहीच नाही आणि वयाच्या ५० व्या वर्षीही तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश शोधू शकता. तुमचं आयुष्य २५ व्या वर्षी संपत नाही. त्यामुळे असं वागणं बंद करा आणि स्वतःचे विचार बदला .

दरम्यान अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर मलायकासाठी पोस्ट शेअर करत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानं मलायकासोबतचा एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं, ‘अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम…’ त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरलही झाली होती. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मलायका अरोरानेही कमेंट केली होती. कमेंट करताना तिने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: