मलायका -अर्जुन लवकरच लग्नबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी शहनाई वाजणार!

मुंबई – कतरिना कैफ -विकी कौशल (Katrina Kaif – Vicky Kaushal) आणि आलिया भट्ट – रणबीर कपूर (Alia Bhatt – Ranbir Kapoor) यांच्या लग्नानंतर आता आणखी एका बॉलिवूड कपल (Bollywood couple) लवकरच लग्न करणार आहे. होय, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjun Kapoor and Malaika Arora) ही चाहत्यांची आवडती जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता हे कपल त्यांच्या नात्याला नाव देण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायका 2022 च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मलायका आणि अर्जुन या हिवाळ्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत लग्न करण्याचा विचार करत आहेत. या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. रणबीर-आलिया आणि कतरिना-विकी कौशलप्रमाणेच त्यांचे लग्नही मुंबईत गुपचूप पद्धतीने होणार आहे. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.
Related Posts
रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायकाला भव्यदिव्य पद्धतीने लग्न करायचे नाही. दोघांचाही साधेपणावर विश्वास आहे आणि म्हणूनच लग्नाची नोंदणी केल्यानंतर ते एका भव्य पार्टीचे आयोजन करतील. या पार्टीचे आयोजन फिल्म इंडस्ट्रीतील सदस्य आणि या जोडप्याच्या अगदी जवळचे लोक करणार आहेत. या दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब आणि मलायकाचे पालक सामील होतील. करीना कपूर खान देखील या जोडप्याच्या खूप जवळ आहे, त्यामुळे तिचे नाव देखील पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अर्जुन त्यांच्या लग्नाच्या ड्रेसवर जास्त खर्च करणार नाहीत. लग्नाच्या नोंदणीच्या दिवशी, मलायका साध्या पण आकर्षक साडीत, तर अर्जुन साध्या कुर्त्यात असू शकतो. दोघेही पार्टीसाठी वेस्टर्न आउटफिट निवडू शकतात.