स्वतःमध्ये वेळीच बदल करा, अन्यथा…, मोदींचा भाजप खासदारांना इशारा

0 338

 नवी दिल्ली –   सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या संसदीय दलाची बैठक (BJP Parliamentary Committee) पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपच्या या अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या खासदारांना इशारा देत अधिवेशनात आणि पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. (Make timely changes in yourself, otherwise …, Modi’s warning to BJP MPs)

या बैठकीत मोदी म्हणाले  मी तुम्हाला नेहमीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. तुमच्या अनुपस्थितीमुळे कामांवर परिणाम पडतो. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहावे. लहान मुलाप्रमाणे सतत सांगणे मला आवडत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला नाही, तर भविष्यात मला तुमच्या संदर्भात मोठा बदल करावा लागेल अशा कडक शब्दात मोदींनी खासदारांना इशारा दिला आहे.

एटीएम मधून पैसे काढणे महागणार, जाणुन घ्या नविन नियम

बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांनी सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात जाऊन जिल्हाध्यक्ष आणि इतर स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक पातळीला पक्ष मजबूत करण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाये आयोजन करण्यास सांगितले आहे. याच अनुषंगाने येत्या 14 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये सर्व भाजप नेत्यांना चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी बोलवणार आहेत. (Make timely changes in yourself, otherwise …, Modi’s warning to BJP MPs)

Related Posts
1 of 1,635

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: