आरोप-प्रत्यारोप करा…. पण जातीपातीचे राजकारण टाळा…

0 153

श्रीगोंदा  :-  तालुक्यातील नागवडे (Nagwade) सहकारी साखर कारखान्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या कारखान्यातील कामकाजावर सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झालेल आहे. परंतु हे आरोप-प्रत्यारोप करताना आता जातीपातीचे राजकारण सुरु झालेली असून ते टाळण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

श्रीगोंदा तालुक्यात अनेक राजकीय नेते असून प्रत्येकाने विकास कामावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका लढविलेल्या आहेत. निवडणुकानंतर एकमेकांच्या सुख-दुःखात प्रत्येकजण सहभागी झालेले असून तीच परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे.
नुकतीच काही दिवसांपूर्वी आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याशी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केलेली आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेऊन प्रत्येकाने एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभाग घेतलेला आहे. पूर्वीपासून सुरु असलेली ही परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे.राजकारण करताना कोणी कोणत्या जातीचा व धर्माचा नसतो. त्याला जाती-धर्माचा म्हणून कोणी निवडून देत नसतो, तर त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच घटक मतदान करीत असतात. त्यामुळे जातीधर्माच्या मुद्दयाचा आधार घेत कोणीही राजकारण करून नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
Related Posts
1 of 1,518
नागवडे कारखान्यावरून सध्या श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले अाहे. सत्ताधार्यांवर व विरोेधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झालेले आहे. बापूसाहेब नागवडे यांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यासाठी निधी कुठला वापरला आहे. याचा सवाल आता उपस्थित करून नागवडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.विरोधकांच्या टीकेवर अद्याप नागवडे यांच्याकडून उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: