पोलिसांची मोठी कारवाई: धुळ्यानंतर आता ‘या’ शहरात तलवारींचा साठा जप्त

नांदेड शहरातील गोकुळ नगर भागातुन ऑटोतून शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी ऑटोची तपासणी केली. त्यावेळी 25 तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी आकाश गोटकवाड याला पोलिसांनी अटक केली. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबूली त्याने दिली आहे. अमृतसर पंजाबहून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपी आकाश याने सांगितले आहे. यात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
धुळ्यात 89 तलावारी जप्त
दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ गाडीतून तलवारींचा साठा जप्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या चितोडगड येथून महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीतून शस्त्रास्त्रे नेले जात होते. ही गाडी आर्गा महामार्गाने जात असताना गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली वाटल्या. त्यांनी स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला अडवलं. पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत शस्त्रास्त्रे सापडले.