NIA ची मोठी कारवाई ; दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणी छापे

0 225
Where does the most wanted Dawood Ibrahim live ?; nephew Alisha made a big revelation before Edis

 

 

मुंबई –  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई करत दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या साथीदारांच्या मुंबईतील (Mumbai) अनेक ठिकाणी छापे मारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनआयने मुंबईतील २० ठिकाणी छापे टाकले आहे. हि सर्व ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या घरांवर अनेक ठिकाणी एनआयएचे छापे सुरू आहेत. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि तपास संस्थेने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरु केली असल्याची माहिती एनआयने दिली आहे. (Major NIA action; Raids on several of Dawood Ibrahim’s associates)

या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनआयएने दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी-कंपनीचे शीर्ष नेतृत्व आणि ऑपरेटर यांच्या सहभागाशी संबंधित गुन्हा दाखल केला होता.

 

 

Related Posts
1 of 2,358

यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथून अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवत आहे. त्याच्या सदस्यांनी केलेल्या गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांच्या संपूर्ण प्रकरणावर एनआयएची करडी नजर आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता. एनआयए ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. (Major NIA action; Raids on several of Dawood Ibrahim’s associates)

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: