जिल्हा रुग्णालयात भीषण आग , मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशी चे निर्देश

0 333
अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रूग्णलयात (Ahmednagar District Hospital)शनिवार सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग (fire) लागली. या भीषण आगीत दहा जणांचा मुत्यू झाला असून १३ ते १४ रुग्ण गंभीर स्वरूपाचे भाजले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.  मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.(Major fire at district hospital, CM directs in-depth inquiry)
रुग्णालयाच्या तळमजल्यावर ही आग लागली असून या ठिकाणी २० ते २५ रुग्ण उपचार घेत होते.  अहमदनगर महापालिकेच्या अग्निशामक पथकामार्फत ही आग वीजवण्यात आली आहे.  मात्र ही आग कशी लागली याची माहिती अद्याप जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही. या आगीत संपूर्ण आय.सी.यु (ICU) जळून खाक झाले आहे.
Related Posts
1 of 1,487
याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी शोकसंवेदना व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यलयातून ट्विट करत देण्यात आली आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)  यांनी देखील या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

दिलासा.. ! पेट्रोल-डिझेलनंतर खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण 

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी देखील  या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत . तर या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक उपाययोजना करावी असे निर्देश देखील दिले आहे.(Major fire at district hospital, CM directs in-depth inquiry)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: