जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगाराला पुण्यात अटक

0 344

अहमदनगर –  महिलांच्या गळ्यातील दागिने, बँक परिसरातील व्यक्तींच्या हातातून पैशाच्या बॅगा धूम स्टाईलने पळविणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने पुण्यात अटक केली.

या आरोपीवर गंभीर स्वरूपाचे ३५ ते ४० गुन्हे असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मागील चार दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सलग दोन दिवस महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईलने चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वी देखील अशा घटना वारंवार घडल्या आहेत.(Major action taken by district police, criminal arrested in Pune)

जमिनीच्या वादातून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप

या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या पथकातील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, बापूसाहेब फोलाणे, संजय खंडागळे, खर्से यांच्या पथकाने पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून आरोपीला अटक केली. त्याने पुण्यासह नगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. (Major action taken by district police, criminal arrested in Pune)

Related Posts
1 of 1,487

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: