मैत्र पालवी ग्रुप व स्व. किसनराव काटे पा. संकुला तर्फे पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप

0 68

शेवगाव  –    तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली व निसर्गाने रौद्ररूप चे दर्शन घडविले.  पूरामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .

ऊस कापूस,तूर,ऊस,भुईमूग, उडीद,मूग,इ पिके वाहून गेली,जमिनी देखील वाहिल्या ,गायी म्हशी,शेळ्या या पशुधनाची हानी झाली. शासनाने पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून काही संस्था ,संघटना यांनी अन्नधान्य, भाजीपाला यांची मदत तातडीने केली व पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. स्व. किसनराव काटे पा.संकुल आखेगाव तर्फे देखील अन्नधान्य व भाजीपाला स्वरूपात मदत करण्यात आली.

शेवगाव येथील  ” मैत्र पालवी(Maitra Palvi Group) ग्रुप व स्व. किसनराव काटे पा. संकुलातर्फे शिवसेना नेते प्रा.शिवाजीराव काटे यांच्या पुढाकारातून 150 कुटुंबाना ब्लँकेट वाटप करण्यात आले. मैत्र पालवी ग्रुपचे सागर मेहेत्रे, मनोज लांडे,  श्रद्धा गोलांडे , प्रा. शिवाजीराव काटे, प्रवीण सातपुते ,सचिन बाहेती,श्रीराम कुलकर्णी, रामप्रसाद व्यास रोहिणी जाधव,जगदीश देशमुख, गोरक्षनाथ भापकर यांनी संकुलाचे विश्वस्त व शेवगाव शिवसेना शहरप्रमुख  सिद्धार्थ काटे यांचे कडे मदत सुपूर्द केली.

नगर जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरी जुगार तेजीत,अनेक कुटुंब उद्ध्वस्त पोलिसांचे दुर्लक्ष

Related Posts
1 of 1,603

आखेगाव,काटेवाडी,तिरमली वस्ती , खडकी,काकडे वस्ती,गोर्डे वस्ती या ठिकाणी सिद्धार्थ काटे,दादासाहेब डोंगरे , अक्षय बोडखे,पांडुरंग नाबदे ,शंकर झिंजुर्के, मंगेश डोंगरे, राजेश फुलमाळी, अनिल फुलमाळी,राजेंद्र काटे,संदीप गोर्डे यांनी नियोजन करून गरजूंना मदत पोहचवली . यावेळी मैत्र पालवी ग्रुपचे प्रा. शिवाजीराव काटे,गोरक्षनाथ भापकर उपस्थित होते. मैत्र पालवी ग्रुपमध्ये उच्चशिक्षित तरुण – तरुणींचा ,अधिकारी वर्गाचा समावेश असून ग्रुप व संघटने मार्फत भविष्यात देखील ग्रामीण भागात सामाजिक कामे करण्याचा सर्व सदस्यांचा मानस असलेचे प्रा. काटे यांनी सांगितले .

हे पण पहा –Ahmednagar | निळवंडे धरणही ओव्हरफ्लो

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: