महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे वटवृक्षात रूपांतर व्हावे. – पं. स. सदस्य बाळासाहेब सोनवणे

0 66
घोडेगाव  :-   महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून काशिनाथ चौघुले यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे ( Balasaheb Sonawane) यांनी केले. (Mahatma Phule Child Care Center should be converted into a banyan tree. – Pt. C. Member Balasaheb Sonawane)
 
श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. 
 
घोडेगाव चे सरपंच राजेंद्र देसरडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. संदिप येळवंडे, सोनई चे सहाय्यक पोलीस  निरीक्षक रामचंद्र करपे, शिंगणापूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, आर एस. पी. अधिकारी शेख सिकंदर अजीज, आंतराष्ट्रीय ख्यातीचे कवी गणेश आघाव आणि काशिनाथ चौगुले आदी यावेळी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना सोनवणे पुढे म्हणाले की, माणूस पैशाने मोठा असण्यापेक्षा मनाने मोठा असला पाहिजे. त्याला समाजाची जाण असली पाहिजे. काशिनाथ चौघुले सारखा भटके विमुक्त समाजातील फाटका माणूस पुढे येऊन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी राबवित असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. त्यांना सोनई व घोडेगाव परिसरातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
 
सोनई पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे म्हणाले की, महात्मा फुले बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून भविष्यात सुज्ञ, सुजाण नागरिक घडावेत.या केंद्रासाठी सोनई परिसरातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. केंद्रातील मुलांना दिवाळीसाठी नवीन कपडे भेट देण्यात येतील अशी घोषणा शिंगणापूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी केली.
Related Posts
1 of 1,487
 
यावेळी सरपंच राजेंद्र देसरडा, कवी गणेश आघाव यांचीही भाषणे झाली. कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणारे डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. हर्षल घोरपडे, डॉ. अमित आंधळे, डॉ. अजित दहातोंडे, डॉ. वसंत खंडागळे, डॉ. श्रावणबाळ कदम, डॉ. विकास भालेराव, डॉ. योगेश कांबळे,  डॉ. सुनिल बोरुडे, डॉ. संजय सोनवणे, डॉ. वैभव बोरुडे यांच्यासह युवा उद्योजक संदिप सोनवणे, बाबासाहेब वैरागर, सुधाकर बर्डे, रविभाऊ आल्हाट यांच्यासह अंगणवाडी सेविका व आशासेविका आदींचा सत्कार करण्यात आला.
 
महात्मा फुले बालसंगोपन केंद्रातील मुला-मुलींनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.  काशिनाथ चौघुले यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय साबळे यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. अधीक्षक सागर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.गुणाबाई चौगुले, सौ. रोहिणी शिंदे, अमोल चौगुले, शिवाजी सावंत, सागर शिंदे यांनी परिश्रम घेतले.(Mahatma Phule Child Care Center should be converted into a banyan tree. – Pt. C. Member Balasaheb Sonawane) 
 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: