ढोरजा येथील महाशिवरात्र यात्रा कोरोनामुळे रद्द….

0 12
 श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथील देवस्थान काशि विश्वनाथ या ठिकानाला पर्यटण स्थळ ‘क’ दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे अनेक लोक येथे पर्यटनासाठी, तसेच देवस्थान व प्रसिद्ध निसर्ग रम्य ठिकाण म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी बहुसंख्येने येतात.

मात्र, सध्या तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून, काशी विश्वनाथ देवस्थानचे अध्यक्ष श्री. सोन्याबापू वाणी, उपाध्यक्ष श्री. नानासाहेब रनसिंग व ट्रस्ट मधील पदाधीकाऱ्यांनी महाशिवरात्रीचा कार्यक्रम रद्द केला आहे. आज दिनांक ११ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीचा कार्यक्रमासाठी देवस्थान काशिविशवनाथ दर्शनासाठी जिल्हाभरातून लोकं हजेरी लावतात, लोकांची वाढती रहदारी आणि गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या – उदयनराजे भोसले 

या कार्यक्रमात सप्ताह लावण्यात येतो, उपस्थित भाविकांना फराळ वाटप करण्यात येते, या दिवशीही अनेक लोक येथे असतात. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेश व सूचनांचे पालन करत, विशवनाथ देवस्थानचे ट्रस्ट चे पदाधीकारी यांनी हे जाहीर केले आहे.

Related Posts
1 of 1,290

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी विजय खेतमाळीस.!

या महाशिवरात्री उत्सव दरम्यान अभिषेक, दंडवत तसेच हरीनाम सप्ताह, फराळाचे कार्यक्रम इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोकांनी मंदिर परिसरात फिरू नये, गर्दी करू नये. अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबत चे निवेदन बेलवंडी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, पोलीस संरक्षण ही मागण्यात आले आहे. अशी माहिती (विश्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष) सोन्याबापू वाणी, (उपाध्यक्ष) नानासाहेब रणसिंग, (सचिव) पांडुरंग व्यवहारे, पांडुरंग ढोरजकर, टकले सर, उमेश व्यवहारे, व विशवनाथ ट्रस्टचे पदाधीकारी यांनी माध्यमांना दिली आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: