Maharashtra Zilla Parishad Election Result , जाणून घ्या निकाल

0 300

नवी मुंबई –  राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे.  धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल घोषित होत आहे.

सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

आयपीएलनंतर धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, धोनी म्हणाला ….

कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांचा निकाल?

धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16
पालघर-15

Related Posts
1 of 1,640

कोणत्या पंचायत समितीच्या किती जागांचा निकाल?

धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: