Maharashtra MLC Election , सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

0 313

नवी मुंबई –   राज्यातील विधानपरिषदेच्या (Legislative Council) आठ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे.  या आठ पैकी सहा जागेसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या सहा जागेचा निकाल १४ डिसेंबर रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिसूचना जरी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.(Maharashtra MLC Election, election declared for six seats)

ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर आणि अहमदनगर येथील जागेसाठी सध्या निवडणूक होणार नाही.  जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या  विधान परिषद जागेसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक, अनेक चर्चाना उधाण

 निवडणूक कार्यक्रम –

अधिसूचना जाहीर – १६ नोव्हेंबर

अर्ज दाखल करण्याची तारीख – २३ नोव्हेंबर

Related Posts
1 of 1,635

अर्जाची छाननी – २४ नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर

मतदान – १० डिसेंबर, मतमोजणी १४ डिसेंबर (Maharashtra MLC Election, election declared for six seats)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: