DNA मराठी

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील उपकेसरी विशाल बनकर यांची जामखेड शहरात भव्य मिरवणूक

0 138

 

प्रतिनिधी अशोक निमोणकर

जामखेड – आपण जोपर्यंत मनापासून व मनगटापासून कुस्तीत उतरत नाही तोपर्यंत यश आपल्याजवळ येणार नाही. पैलवान हा मोबाईलच्या आहारी गेलेला नसावा त्याने यातून बाहेर पडून कुस्ती व जीमवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आँलम्पिकमध्ये सुवर्णपदक पाहीजे असेल तर मायबाप सरकारने हरियाना राज्यात पैलवानला जशा सूविधा व बक्षिस वितरण केले जाते त्याप्रमाणे आपल्या राज्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या तर पदके मिळतील
असे मत अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित पै. काकासाहेब पवार यांनी व्यक्त केले.

जामखेड येथे लोकसहभागातून सारोळा रोडवर साकारलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखान्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अयोजीत कार्यक्रमात अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार बोलत होते. यावेळी शस्त्रांचे पुजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी पै. काकासाहेब पवार, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपकेसरी विशाल बनकर, पै. सिकंदर शेख यांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती. यात मोठय़ा संख्येने युवा वर्ग व नागरीक मोटारसायकल घेऊन सहभागी झाले होते.

Related Posts
1 of 2,482

सामाजिक कार्यकर्ते अशोक डोंगरे म्हणाले की, गावा – गावात चावडी आहे पण तालीम नाही गाव तेथे तालीम पाहिजे. पै. काकासाहेब पवार यांना विनंती आहे की, महाराष्ट्राचे नेते ८२ वर्षीय शरदचंद्रजी पवार हे कुस्तीप्रेमी आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सरकारची मदत घ्यावी किंवा लोकसहभागातून गावागावात तालीम निर्माण करून कुस्तीप्रेमींना प्रोत्साहन द्यावे. जामखेडची नागपंचमी ही नाचगाण्यासाठी प्रसिद्ध होती. ती ओळख हभप विजय बागडे यांनी धार्मिक मेळ घातला तसेच कुस्ती हगामा सुरू झाला. त्यामुळे हगाम्याचे वेगवेगळे फड गाजवणारे मल्ल येथे येऊन गेले आहेत. आजच्या कार्यक्रमातील तिघांनी आँलिम्पिंकमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक मिळावे यासाठी सरकारने मदत नाही दिली तरी मी मदत करील असा विश्वास दिला.

 

आपण जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहोत पण आॅलपिक पदकात आपण ४३ व्या स्थानावर आहेत. अफ्रीका खंडातील छोटे छोटे देश ज्यांची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहेत ते मोठ्या प्रमाणावर पदके कमावतात पण दुस-या क्रमांकावर येत नाही हे आपले दुर्दैव आहे. यावेळी उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, पैशांपेक्षा शरिरसंपत्ती महत्त्वाची आहे. सुदृढ शरिरयष्टी आवश्यक आहे. त्यामुळे तरुणांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मंगेश आजबे म्हणाले, जामखेड परिसरातील गोरगरीब मुलांना जिमची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने आम्ही स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा नावाने जिमखाना व कुस्तीच्या मॅटची सोय केली आहे. कुस्ती स्पर्धामध्ये मुलांना मॅटची सवय नसेल तर आपल्या ग्रामीण भागातील पैलवान मुलांकडे चांगले कौशल्य असूनही कुस्ती स्पर्धामध्ये मागे राहत होती. आता या जिमखानामुळे पैलवानांना या सर्व सोयी उपलब्ध होणार असून सर्व काही मोफत उपलब्ध करून देत आहोत असे आवर्जून मंगेश आजबे यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: